Helen Adams Keller Jayanti 2026

This year, Chetana Apangmati Vikas Sanstha honored Smt. Jaie Uttam Khamkar, Founder President of Malganga Andh Apang Seva Sanstha, Pune, with the Helen Keller Award, presented by renowned Marathi author Dr. Krushnat Khot

सस्नेह नमस्कार, 

संस्थेत आज जागतिक बधिरांध दिवस व हेलन केअर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिरूर येथील जाई खामकर यांचा ख्यातनाम लेखक कृष्णात खोत यांचे हस्ते सन्मान चिन्ह, मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जाई खामकर यांनी त्यांच्या खडतर प्रवासाचे  सांगितलेले अनुभव उपस्थितांना थक्क करून गेले. 

आज अनेक अपंगांना आपल्या पायावर उभे करून सन्मानाने जगण्याचे बळ त्या देत आहेत. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या अंधांना दृष्टिहीन म्हणू नका कारण त्यांना दृष्टी आहे दृष्टिकोन आहे.